पिपीसी न्यूज नेटवर्क:
लायन्स इंटरनॅशनल क्लब व स्टेप्स फाउंडेशनच्या वतीने इयत्ता दहावी व इयत्ता बारावी परीक्षार्थीसाठी ग.दि.माडगूळकर सभागृह निगडी प्राधिकरण येथे यशस्वी भव २.० प्रेरणा व करिअर मार्गदर्शन कार्यक्रम दिनांक २२ जानेवारी २०२६ रोजी संपन्न झाला. या कार्यक्रमास स्टेप्स फाउंडेशनचे व लायन्स क्लब इंटरनॅशनलचे पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थितांमध्ये आयोजक संदेश मुखेडकर सर, शिक्षणतज्ञ व प्रेरणादायी वक्त्या रेशु अग्रवाल, बी एल जोशी सर, राजेंद्र गोयल, डॉ.केतन देशपांडे, सचिन कुलकर्णी, संदीप पोलकम, पुनम कुलकर्णी,शिल्पा गायकवाड,प्रतिभा चक्रवर्ती ,विजय शंकर ,ॲड.अजित बोराडे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रा.संदेश मुखेडकर सर यांनी केले,
यावेळी बी.एल जोशी सरांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. FUEL चे संस्थापक डॉक्टर केतन देशपांडे यांनी विद्यार्थी जीवनात काय करावे अभ्यासाचे तंत्र याबद्दल मार्गदर्शन केले, यानंतर रेशु अग्रवाल राजेंद्र गोयल यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले पूनम कुलकर्णी मॅडम यांनी मराठी हिंदी व इंग्रजी विषयाचे पेपर सोडविण्याबद्दल मार्गदर्शन केले, प्राध्यापक अश्विन गुडसुरकर सर यांनी गणित विषयाबद्दल मार्गदर्शन केले, तर प्राध्यापक संदेश मुखेडकर यांनी कॉमर्स क्षेत्रातील करिअर व फायनान्शिअल प्लॅनिंग बद्दल मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक नितीन साळी सर यांनी केले, तर आभार प्रा.अश्विन गुडसुरकर यांनी मानले. त्याचबरोबर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विजय चव्हाण, व्यंकटेश सोमवंशी, ओंकार शिकारे, लियोन कुटीनो, अभिषेक आडे, भूषण तरकसे, आदित्य कुलकर्णी,नमन तांबे सोहम कुलकर्णी ,अहम चौरसिया साई,अंदुरे लिव्हिया कुटीनो,वैष्णवी सिंघ,सृष्टी कुलकर्णी,कनवीर कौर,जानवी कन्नोजिया या सर्व स्टेप्स फाउंडेशनच्या सदस्यांनी भरपूर परिश्रम घेतले.

















































