पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपळे गुरव:
पिंपळे गुरव भाऊ नगर येथे आज सकाळी डेकोरेशन चे साहित्य पुरवणाऱ्या गोडाऊनला भीषण आग लागली. आगीची व्याप्ती एवढी मोठी होती की आजूबाजूच्या भागात धुराचे साम्राज्य निर्माण झालं. गोडाऊनचे व्यावसायिक भाडेकरू मारुती शिंदे डेकोरेशनचे साहित्य पुरवठा येथून करत होते. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. यात सर्व माल जळून खाक झाला असून कोणतीही जीवित हानी झाली नाही. वेळेवर अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचल्यामुळे मोठा अनर्थ टळला. तसेच स्थानिक आमदार शंकर जगताप, नगरसेवक शशिकांत कदम, माजी नगरसेवक सागर अंघोळकर. यांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन घटनेची पाहणी केली.

अरुंद रस्ते त्यात रहीवासी लोकांनी बेशिस्तपणे केलेल्या वाहनांचे पार्किंग यामुळे अग्निशामक दलाची वाहन घटनास्थळी पोहोचण्याकरता उशीर झाला. यामुळे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला.
अग्निशामक दलाच्या तत्परते मुळे आग लवकर आटोक्यात आणण्यात यश आले आहे. सुदैवाने कोणती जीवित हानी झाली नाही. व्यावसायिकांनी अशा गंभीर परिस्थिती चा सामना करण्याकरात सतर्क राहिलं पाहिजे. आपल्या जागेत फायर फायटिंग उपकरणे बसवून घेणे गरजेचं आहे. प्रत्येक व्यवसाय करणे आपल्या जागेचे फायर ऑडिट करून घेणे गरजेचे आहे यामुळे अशी घटना टाळता येऊ शकते.
आमदार शंकर जगताप



















































