
शिवसंग्राम व भारतीय संग्राम परिषदेचे संस्थापक अध्यक्ष नामदार श्री .विनायकराव मेटे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज शिवसंग्राम युवक आघाडी पुणे शहर कडून एक हजार कुटूंबाना आर्सेनिक अल्बम 30 चे वाटप करण्यात आले. तसेच ऑनलाईन स्पर्धाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. यामध्ये निबंध लेखन, चित्रकला आणि डान्स स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे.
विविध कुटुंबाना आर्सेनिक गोळ्यांचे वाटप पुणे शहर युवक आघाडी अध्यक्ष नितीन ननावरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किशोर मुळूकपाटील, दिपक कदम, सचिन शिंदे, सचिन खुडे, सागर कशिद, अमित दळवी आणि रुपेश दोडके उपस्थित होते.





















































