आज पुणे जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी पुणे महापालिकेचे माजी नगरसेवक शिवाजी बांगर यांच्या घरी भेट दिली. निमित्त होते, शिवाजी बांगर यांची कन्या स्नेहल शिवाजी बांगर यांची नुकतीच पुणे शहर युवक काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या अभिनंदनासाठी अंकिता पाटील थेट त्यांच्या घरी गेल्या तसेच यावेळी त्यांनी बांगर परिवारासोबत दिलखुलास गप्पा देखील मारल्या. यावेळी अंकिता पाटील यांनी स्नेहल यांच्याशी राजकारणासोबतच विविध विषयांवर चर्चा करून त्यांना मार्गदर्शनही केले.





















































