प्रभाग 1 (कळस-धानोरी) मध्ये कंटेनमेन्ट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) घोषित करण्याबाबत तसेच प्रभागात रॅपिड कोरोना टेस्टिंग सुरू करण्याबाबत मागणी
पुणे शहरामध्ये विविध भागांमध्ये कंटेनमेन्ट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) निश्चित केलेले आहेत. कारण संबधित परिसरामध्ये अधिक रुग्ण असल्यामुळे नियमानुसार कंटेनमेन्ट झोन (प्रतिबंधीत क्षेत्र) जाहीर करण्यात आलेले आहेत.
या अनुषंगाने प्रभाग क्रमांक. १ कळस-विश्रांतवाडी-धानोरी व इतर उपनगरांमध्ये साधारणपणे ४०० ते ५०० कोविड रुग्ण आहेत. या ठिकाणी रुग्णसंख्या समूहपद्धतीत व कुटुंबनिहाय रुग्ण आढळून येत आहेत.
आपल्या प्रभाग क्रमांक १. कळस-विश्रांतवाडी-धानोरी व उपनगरांमध्ये ह्याचा प्रतिबंध करण्याकरिता खालील प्रमाणे मागण्या व उपाय योजनांबाबत चे निवेदन सहायक आयुक्त श्री. विजय लांडगे साहेब ह्यांना देण्यात आले आहे.
१. प्रभाग क्रमांक 1 कळस-विश्रांतवाडी-धानोरी व उपनगरांमध्ये कंटेनमेन्ट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) निश्चित करणे
२. रॅपिड कोरोना टेस्टिंग (फिरते) सम्पूर्ण कळस-विश्रांतवाडी-धानोरी व उपनगरांमध्ये कार्यान्वित करणे
३. अद्यावत वैद्यकीय आरोग्य तपासणी व संलग्न सेवा जसे घसा चाचणी (स्वाब), रक्त दाब, शुगर व इतर असे आरोग्य तपासणी असे अद्यावत तपासणी-वाहन मिळण्याबाबत
वरील मागणींच्या संदर्भात लांडगे साहेब यांनी कंटेनमेन्ट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) निश्चित करणे व रॅपिड टेस्ट बाबत लवकरात लवकर अंमलबजावणी करू असे आश्वासन दिले आहे.
या संदर्भातील निवेदन देताना विभागीय आरोग्य निरीक्षक श्री.संजय घावटे साहेब, लिंगू साखरे, दानशूर गुंजाळ व शैलेश रणनवरे उपस्थित होते.





















































