पी. पी. सी. न्युज; प्रतिनिधी अजय जाधव!
पुण्यातील बुधवार पेठ भागातील शिवसेनेचे दिवंगत माजी नगरसेवक विजय मारटकर यांच्या मुलाचा पाच ते सहा जणांनी दीपक वर धारदार शस्त्राने खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दीपक मारटकर असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,दिपक त्याच्या काही सहकार्यांसोबत कार्यालयाबाहेर उभा असताना त्याच्यावर प्राणघातक हल्ला झाला.शुक्रवार पेठेतील गवळी येथे मध्यरात्री बारा वाजण्याच्या सुमारास दीपक आणि त्याचे काही सहकारी कार्यालयाबाहेर थांबले होते. त्यावेळी पाच ते सहा जणांनी दीपक वर धारदार शस्त्राने सपासप वार केले. काही कळण्याच्या आतच दीपक रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला.
जखमी अवस्थेतच दीपकला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र दिपकला डॉक्टरांनी मृत घोषित केले.हा हल्ला करण्यात आला यामागील नेमके काय कारण आहे हे अद्याप समजू शकले नाही.हल्लेखोरांचा शोध परिसरातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून घेतला जात आहे, अशी माहिती फरासखाना पोलिसांनी दिली. दीपक हा युवा सेनेचा पदाधिकारी देखील होता.या प्रकरणांमध्ये पोलिसांनी तपास सुरू केला असून लवकरच हल्लेखोरांना अटक केली जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.





















































