*पुणे : दिनांक ४जानेवारी २०२१:* अठराव्या शतकात अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानाही सावित्रीबाई फुले यांनी केलेले कार्य, त्यांचा जीवनसंघर्ष प्रत्येकाने स्मरणात ठेवून प्रेरणा घ्यावी, आज सर्वांना शिक्षणक्षेत्राद्वारे एक स्वतंत्र आयुष्यजगण्याची संधी मिळत आहे तर त्याचे खरे श्रेय सावित्रीबाई फुलेंना आहे, असे मत कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता विभागाच्या पुण्याच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी व्यक्त केले. यशस्वीएकेडमी फॉर स्किल्स संस्थेच्यावतीने सावित्रीबाई फुले महिला शिक्षण दिनानिमित्त शिवाजीनगर येथील महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतील विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र वितरण करताना त्या बोलत होत्या. यावेळीबोलताना त्या पुढे म्हणाल्या कि,शासनाची कौशल्यप्रशिक्षण योजना ही चांगली आहेच, मात्र ‘यशस्वी’ सारख्या संस्थेतील प्रशिक्षक जेव्हा पूर्ण प्रभावीपणे या योजनांची अंमलबजावणीकरतात तेव्हाच विद्यार्थ्यांना खरे कौशल्य प्रशिक्षण प्राप्त होते आणि ते स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आत्मनिर्भर होताना दिसतात. आज ज्या विद्यार्थ्यांनीं स्वतःचे स्नॅक्स सेंटरचे व्यवसाय सुरु केले आहेत अशांचा सत्कार होत असताना पाहून खऱ्या अर्थाने ही कौशल्य प्रशिक्षण योजना यशस्वी झाल्याचे समाधान होत आहे. याप्रसंगीआवास फूड्स च्या संचालिका मेघा कुलकर्णी यांनी आपल्या मनोगतात सांगितले कि, आमच्या फूडसच्या व्यवसायात टाळेबंदीच्या काळात रुग्णालयातील कॅंटीनचे संपूर्ण व्यवस्थापन ‘यशस्वी’ संस्थेच्या विद्यार्थ्यानी अतिशय व्यवस्थित संभाळले.आम्हालाही या विद्यार्थ्यांना नोकरीची संधीदिल्याचे समाधान आहे. यावेळी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेतील प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.तसेचयावेळी प्रातिनिधिक स्वरूपात संजय मोरे या विद्यार्थ्याने प्रधानमंत्री कौशल्यविकास योजनेतील प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वतः सुरु केलेल्या स्नॅक्स सेंटरच्या व्यवसायाची यशोगाथा सांगितली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ‘यशस्वी’ संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी संस्थेद्वारे राबविण्यात येत असलेल्या विविध कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांची माहिती सांगितली. ‘यशस्वी’ संस्थेचे संचालक राजेश नागरे यांनी आभार प्रदर्शन तर सूत्रसंचालन योगेशरांगणेकर यांनी केले. तरकार्यक्रमात सुरुवातीला आरती देशपांडे या विद्यार्थिनीने सावित्रीबाई फुलेंचा जीवनपट थोडक्यात उलगडून दाखविला.या कार्यक्रमासाठी शमिकातांबे, ईशा पाठक, स्निग्धा, रागिणी वळसे, , शाम वायचळ, ज्ञानेश्वर गोफण आदींनी विशेष सहकार्य केले. सामूहिक राष्ट्रगीत गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
Home पुणे शहर / जिल्हा *सावित्रीबाई फुले यांचा जीवन संघर्ष प्रत्येकाने स्मरणात ठेवून प्रेरणा घ्यावी-अनुपमा पवार यशस्वी संस्थेतर्फे आयोजित प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे प्रशस्तीपत्र वितरण संपन्न*.
*सावित्रीबाई फुले यांचा जीवन संघर्ष प्रत्येकाने स्मरणात ठेवून प्रेरणा घ्यावी-अनुपमा पवार यशस्वी संस्थेतर्फे आयोजित प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचे प्रशस्तीपत्र वितरण संपन्न*.
About the author
Related Articles
ठळक बातम्या
ट्विटर
Check your twitter API's keys
Top News
Check your twitter API's keys
Ads
Weather
Cairo
Apr20 05:11
- Humidity 25%
- Pressure 1012
- Winds 5.66mph
now
25℃
-
Tue Apr21sky is clear
- HI/LO: 28/14℃
- Humidity: 28
- Pressure: 1015
- Winds: 8.34
-
Wed Apr22sky is clear
- HI/LO: 29/15℃
- Humidity: 27
- Pressure: 1015
- Winds: 9.74
-
Thu Apr23sky is clear
- HI/LO: 31/16℃
- Humidity: 20
- Pressure: 1012
- Winds: 7.48
-
Fri Apr24few clouds
- HI/LO: 30/18℃
- Humidity: 18
- Pressure: 1009
- Winds: 7.98
-
Sat Apr25sky is clear
- HI/LO: 33/20℃
- Humidity: 12
- Pressure: 1008
- Winds: 4.46
-
Sun Apr26sky is clear
- HI/LO: 28/17℃
- Humidity: 38
- Pressure: 1014
- Winds: 8.75
Check your twitter API's keys





















































