पुणे:- पुणे विभागातील ५ लाख ८९ हजार ५१० कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ६ लाख १८ हजार ६५५ झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या १२ हजार ८०४ इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण १६ हजार ३४१ रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण २.६४ टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण ९५.२९ टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण ४ लाख ८ हजार ५३ रुग्णांपैकी ३ लाख ८८ हजार ६१० रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण १० हजार २९५ आहे. कोरोनाबाधित एकूण ९ हजार १४८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण २.२४ टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण ९५.२४ टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण ५८ हजार ७२३ रुग्णांपैकी ५५ हजार ७१७ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या १ हजार १५६ आहे. कोरोनाबाधित एकूण १ हजार ८५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण ५२ हजार ९५० रुग्णांपैकी ५० हजार २१६ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या ८९३ आहे. कोरोनाबाधित एकूण १ हजार ८४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण ४८ हजार ४९२ रुग्णांपैकी ४६ हजार ५६७ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या १६७ आहे. कोरोनाबाधित एकूण १ हजार ७५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण ५० हजार ४३७ रुग्णांपैकी ४८ हजार ४०० रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या २९३ आहे. कोरोनाबाधित एकूण १ हजार ७४४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये १ हजार ८८४ ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात १ हजार ६००, सातारा जिल्ह्यात ११९, सोलापूर जिल्ह्यात १०४, सांगली जिल्ह्यात १७ तर कोल्हापूर जिल्ह्यात ४४ अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण १ हजार २४१ आहे. पुणे जिल्हयामध्ये १ हजार ८३, सातारा जिल्हयामध्ये १८, सोलापूर जिल्हयामध्ये १०१, सांगली जिल्हयामध्ये ७ व कोल्हापूर जिल्हयामध्ये ५ रुग्णांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण ४० लाख ६५ हजार १५३ नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी ६ लाख १८ हजार ६५५ नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.