पिपीसी न्यूज नेटवर्क;
प्रतिनिधि अजय जाधव!
पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्णकुमार यांनी गुन्हेगारांचा बीमोड करण्यासाठी गुन्हेगारी, तडीपार, फरार तसेच गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांवर नजर ठेवून त्यांच्यावर शहरातील गुन्हेगारीला अळा घालण्या संदर्भात उपाययोजना करा असा आदेश जारी केला असता त्या अनुषंगाने२१ जानेवारी रोजी खंडणीविरोधी पथकाने पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप. निरीक्षक शाकीर जनेडी,पो. हवलदार हजारे, कानगुडे पो.ना. काटकर, पाटील, गोडांबे पो. शिपाई मगर,गारगोटे यांच्या पथकाने असे रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची माहिती घेत पेट्रोलिंग करत असताना दुर्गामाता चौक येथे आले.पथकातील संदीप पाटील व शैलेश मगर यांना तेथे बातमी दरा मार्फत माहिती मिळाली की रेकॉर्ड वरील गुन्हेगार जेसन डिकोनाहा निगडी ओटा स्कीम स्मशानभूमी समोरील रोड वर थांबला असून त्याच्याजवळ पोस्टल सारखे हत्यार आहे. मग मग मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार याचा शोध घेतला. रेकॉर्डवरील गुन्हेगार जेसल डीकोना हा कोणाची तरी वाट पाहत थांबलेला दिसला. तो पळून जाणार नाही याची खबरदारी घेऊन त्यास ताब्यात घेण्यात आले. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्या कमरेला देशी बनावटीचे रिवाल्वर व दोन जिवंत काडतुसे असा ३०,४००/- रु. किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला व त्याच्या विरुद्ध आर्म एक्ट कलमानुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
आरोपी जेसन डीकोणा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात विविध गुन्ह्याची नोंद आहे.
सदरची कारवाई पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपयुक्त सुधीर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे मॅडम, यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणीविरोधी पथकाचे अंमलदार गणेश हजारे, अशोक दूध वणे, सुनील कानगुडे, संदीप पाटील, शकूर तांबोळी, किरण काटकर, शैलेश मगर, निशांत काळे, आशिष बोटके, प्रदीप गोडांबे, सुधीर डोळस, अशोक गारगोटे, प्रदीप गुट्टे, यांच्या पथकाने केली आहे.





















































