कला माणसाला सक्षम बनवते
१)कलेचा वारसा कसा लाभला? कुटुंबातुनच कलेचा वारसा मिळाला का ?
-हो कुटुंबातूनच कलेचा वारसा मिळाला. वडील पंडित सूर्यकांत गायकवाड आणि आई सौ संगीता गायकवाड हे दोघेही गायक असल्यामुळे घरातूनच कलेचा वारसा लाभला. तसेच माझा मोठा भाऊ रमाकांत गायकवाड हादेखील शास्त्रीय संगीत गायक आहे.
२) या क्षेत्रातच का आलात? या क्षेत्राने आत्ता पर्यंत तुम्हाला काय काय दिले?
– लहानपणापासूनच घरात गाण्याचे संस्कार असल्यामुळे या क्षेत्रात आले. आणि या क्षेत्राने आज पर्यंत मला आत्मिक आनंद आणि स्वतःची एक ओळख दिली.
३) या क्षेत्रात आज प्रगती करित आहात त्याचे श्रेय कोणाला जाते?
-याचे संपूर्ण श्रेय आई वडील आणि गुरुजन यांना जाते
४) या क्षेत्रातील स्पर्धेत स्वतःला टिकवणे किती अवघड आहे ?ते तुम्ही कसे करता?
– या संगीत कलेशी समर्पित होऊन साधना करणे हाच या क्षेत्रातील स्पर्धेत स्वतःला टिकून ठेवण्याचा एक उत्तम मार्ग मला माझ्या गुरुजनांनी दिला आहे. आणि हाच मार्ग मी आत्तापर्यंत जोपासत आहे.
५) फावल्या वेळात तुम्ही कोणता छंद जोपासता?
– ५. फोटोग्राफी,ट्रॅव्हलिंग आणि चित्रकला.
६) तुमचे भविष्यातील नियोजन काय आहे ? पुढील काळात तुम्ही काय करणार आहात ?
– मी स्वतः संगीत बद्ध केलेल्या रचना जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोहोचवणे. आणि आणखी नवनवीन रचना संगीतबद्ध करणे.तसेच संगीतातील नवीन तंत्रज्ञान शिकायला आवडेल.
शब्दांकन – तन्मयी नचिकेत मेहेंदळे (उपसंपादिका पीपीसी न्यूज नेटवर्क, पुणे.)