पिपीसी न्यूज नेटवर्क,
अजय जाधव
पिंपरी-चिंचवड : गुन्हे शाखा युनिट-३ने केलेल्या धडक कारवाईत अवैध विदेशी दारू साठवून विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत सुमारे २,००,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
दिघी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना गुन्हे शाखा युनिट-३च्या पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दाभाडे सरकार चौक परिसरातील एका शेतामध्ये काही इसम विदेशी दारू साठवून विक्री करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तत्काळ छापा टाकत कारवाई केली.
या कारवाईत रामप्रसाद साहेबराव साळुंखे (वय ३३, रा. चऱ्होली खुर्द, पुणे), तिलक हेमंत पटेल (वय २९, रा. वापी, गुजरात) आणि अनिल रामसूरत यादव (वय २४, रा. वापी, गुजरात) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून रॉयल चॅलेंज, इम्पिरियल ब्लू, रॉयल स्टॅग आदी ब्रँडच्या विदेशी दारूच्या बाटल्या तसेच तीन मोबाईल फोन असा एकूण २,००,४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
सदर कारवाई पोलीस आयुक्त श्री. विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त डॉ. शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त श्री. सारंग आवाड, पोलीस उपायुक्त (गुन्हे) डॉ. शिवाजी पवार, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. विशाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-३चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष कसबे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील जावळे, पोलीस अंमलदार सोमनाथ बोऱ्हाडे, सागर सुर्वेवंशी, श्रीधन इचके, शशिकांत नांगरे, समीर काळे, निखिल फापाळे व राजकुमार इघारे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या केली



















































