पीपीसी न्यूज प्रतिनिधी:अजय जाधव!
पुणे:हनुमंत गायकवाड यांची बीव्हीजी कंपनी व सुमित फॅसिलिटीज यांना 108 ॲम्बुलन्सचे टेंडर दिले गेले. दहा हजार कोटींच्या टेंडरमध्ये 6 हजार कोटींचे कमिशन दिल्याचा गौप्यस्फोट आज एका दैनिका मधून करण्यात आला आहे. ज्याप्रमाणे स्वच्छतेचे टेंडर रद्द करण्यात आले त्याप्रमाणे 108 ॲम्बुलन्स चे टेंडर तातडीने रद्द करण्यात यावे. 108 ॲम्बुलन्स सेवा शासनाने स्वतः कार्यान्वित करावी अशी मागणी दीपक जाधव यांच्या जागल्या आरोग्य हक्क समितीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
आरोग्य विभागाला तुटपुंजा निधी मिळतो. त्यावरही काही बडे ठेकेदार डल्ला मारतात. गोरगरिबांची सरकारी आरोग्य व्यवस्था सुधारायची असेल तर या ठेकेदारांचा व भ्रष्टमंत्र्यांचा बंदोबस्त शासनाला करावा लागेल.