पीपीसी न्यूज: प्रतिनिधी:
देहरादून येथे झालेल्या ऑल इंडिया KIO राष्ट्रीय कराटे स्पर्धा नुकतीच पार पडली. सदर स्पर्धेत संपूर्ण भारतातून kio कराटे स्पर्धक सहभागी झाले होते. ते प्रत्येक जण आपापल्या राज्याचं प्रतिनिधित्व करत होते. या स्पर्धेत महाराष्ट्राकडून ९ वर्षे वयोगटात काता प्रकारात युग सोनवणे यानी खरच कामगिरी करताना संपूर्ण देशात ३रा क्रमांक पटकावला.

महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ९ वर्ष वयोगटात वैयक्तिक काता प्रकारात युग सोनावणे याने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत संपूर्ण देशामध्ये तिसरा क्रमांक मिळवत कांस्य पदक पटकावले. याबद्दल सर्वत्र त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. युग हा गेली ३वर्षे चॅम्पियन्स कराटे क्लब , सिंहगड रोड शाखेमध्ये शिहान संतोष मोहिते आणि सेन्सई शुभम बने यांच्या मार्गदर्शनात कराटे चे प्रशिक्षण घेत आहे. त्याच्या यशामागे त्याच्या प्रशिक्षकांचा आणि पालकांचा मोलाचा वाटा आहे अशी प्रतिक्रिया विजयानंतर युग सोनवणे यानी दिली





















































