पुणे : (ppcnews.in)
भारती विद्यापीठ पूना कॉलेज ऑफ फार्मसी, पुणे आणि अहमदाबाद येथील श्री बी.व्ही. पटेल एज्युकेशन ट्रस्ट यांच्यात संशोधन सहकार्य, प्रशिक्षणासाठी १९ ऑगस्ट २०२५ रोजी सामंजस्य करार झाला आहे.
या वेळी पूना कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य डॉ. आत्माराम पवार, बी व्ही पटेल इंस्टिट्यूट चे संचालक डॉ.मनीष निवसरकर, उप संचालक डॉ.नीता श्रीवास्तव,उपप्राचार्य डॉ. वर्षा पोखरकर, डॉ. सत्यनारायणन आणि कार्यशाळा संयोजक डॉ.वैभव शिंदे उपस्थित होते.कार्यक्रमाचा समारोप सौ.मालती साळुंके यांनी केला.

या कराराचा उद्देश औषधनिर्माण शास्त्र क्षेत्रातील संशोधन सहकार्य, ज्ञानाची देवाणघेवाण आणि क्षमता विकास साधणे हा आहे. या भागीदारीतून संयुक्त संशोधन प्रकल्प, प्रशिक्षण कार्यक्रम तसेच उच्चस्तरीय विश्लेषणात्मक अभ्यास यांना चालना मिळणार असून, शैक्षणिक उत्कृष्टता व नाविन्यतेस प्रोत्साहन मिळणार आहे.
या दोन्ही संस्था द्वारे संयुक्तिक एक आठवड्याचा राज्यस्तरीय फार्मसी शिक्षक व विद्यार्थी साठी स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा आयोजित केली आहे . आय सी टी विद्यापीठ मुंबई चे डॉ. के एस लढ्ढा हे प्रमुख वक्ते व ट्रेनर मार्गदर्शन करणार आहेत.




















































