अनुज्ञप्ती चाचणीकरिता ‘अपॉइंटमेंट रिशेड्युल’ करुन घेण्याचे आवाहन
पुणे, (ppcnews.in)दि. २८: (जिमाका वृत्तसेवा):
गौरी पूजनानिमित्त १ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात स्थानिक सुट्टी असल्यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड अंतर्गत वाहन चालन प्रशिक्षण व संशोधन (आयडीटीआर) येथील कामकाज बंद राहणार आहे; त्यामुळे अर्जदारानी अनुज्ञप्ती चाचणीकरिता पुढील ७ दिवसांत कामकाजाच्या दिवशी अपॉइंटमेंट रिशेड्युल करुन घ्यावी.

शिकाऊ अनुज्ञप्तीची वैधता १ सप्टेंबर रोजी समाप्त होत असलेल्या अर्जदारांनी २९ ऑगस्ट २०२५ रोजी आयडीटीआर येथे चाचणी द्यावी, असेही पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.





















































