आज आळंदी आणि देहू येथून संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे पंढरपूर साठी प्रस्थान झाले आहे. प्रस्थानापूर्वी पुणे जिल्हाधिकारी यांनी संत तुकाराम महाराज यांची पूजा केली त्यानंतर आळंदी मधून माऊलींच्या गाडीला पंढरपूरसाठी रवाना केले. दोन्ही बस मध्ये २०- २० लोकांनाच परवानगी देण्यात आली आहे. या दोन्ही पालखी संध्याकाळी ७ पर्यंत पंढरपूर येथे पोचतील.
यासोबतच सासवड येथून संत सोपानकाका आणि चांगावटेश्वर यांच्याही पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले आहे.





















































