पिंपरी:– पिंपरी-चिंचवड शहरातील पवना जलवाहिनीचा प्रकल्प अनेकवेळा चांगलाच गाजला आहे. या प्रकल्पावरून परत मोठे वादळ उठण्याची शक्यता आहे. कारण पवना बंद जलवाहिनीचा झालेला खर्च सहशहर अभियंता रामदास तांबे यांच्याकडून वसूल करा असे पत्र माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश वाघेरे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिले आहे.
वाघेरे पत्रात म्हणतात, पवना बंद जलवाहिनीला लागणारी जमीन ताब्यात नसताना तत्कालीन कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा रामदास तांबे यांनी २००८ रोजी घाई-घाईने या प्रकल्पाची निविदा काढली. शेतकर्यांनी विरोध केला. त्यामुळे या प्रकल्पाला विरोध झाला. तत्कालीन मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी यांनी या प्रकल्पाला स्थगिती दिली. आज रामदास तांबे यांच्या चुकीमुळे सुमारे १५० कोटींचे नुकसान महापालिकेचे झाले आहे. या प्रकल्पाला स्थगिती असताना पुन्हा एकदा आत्ताचे सहशहर अभियंता रामदास तांबे यांनी ज्या सल्लागारामुळे प्रकल्प रखडला त्याच सल्लागाराला थेट पद्धतीने सल्लागार म्हणून नेमले आहे. पुन्हा एकदा रामदास तांबे यांनी चुक केली आहे. रामदास तांबे यांच्यामुळे हा प्रकल्प ३९० कोटी रुपयांवरून आता ७०० कोटी रुपयापर्यंत जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पात जेवढे महापालिकेचे नुकसान झाले आहे ते नुकसान सहशहर अभियंता रामदास तांबे यांच्या कडून वसूल करावे.
अन्यथा आयुक्त साहेब आपल्या विरोधात न्यायालयीन लढा दिला जाईल असा सूचक इशाराही वाघेरे यांनी आयुक्तांना दिला आहे.





















































