पि. पी सी न्यूज; प्रतिनिधी अजय जाधव!
शिवसेनेच्या कसबा विधानसभा मतदारसंघ युवा सेनेचे पदाधिकारी दीपक मारटकर यांच्या हत्येप्रकरणी गुन्हे शाखेने आणखीन दोघांना नगरमधील काष्टी तून अटक केली. या गुन्ह्यात आत्तापर्यंत 9 जणांना अटक केली आहे.
संदीप उर्फ मोंगळ्या प्रकाश कोलते (वय 23राहणार लोहियानगर) आणि लखन मनोहर डावरे ( वय 30 रा. पंढरपूर) अटक केलेल्यांची नावे आहेत.
दीपक मारटकर यांची गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास सपासप वार करून हत्या करण्यात आली. त्यानंतर सात जणांना अटक करण्यात आली होती. हल्ल्यातील दोघेजण नगरमधील काष्टी येथे असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून राजवाडी परिसरात संदीप उर्फ मूगळ्या आणि लखन ला पाठलाग करून ताब्यात घेतले.चौकशी त्यांनी गुन्ह्यात सहभागी असल्याची कबुली केली.
ही कामगिरी सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर शिवाजी पवार, पोलीस निरीक्षक सुनील ताकवले, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक हनुमान शिंदे,सचिन जाधव ,संजय वरखडे ,बाबा चव्हाण ,अशोक माने, इमरान शेख, सुधीर माने ,प्रशांत गायकवाड यांच्या पथकाने केली





















































