पि.पि. न्युज प्रतिनिधी;अजय जाधव!
पिस्टल व कोयत्याचा धाक दाखवून कार लुटण्याचा प्रयत्न करणार्या गुन्हेगारांचा टोळीला हिंजवडी पोलिसांकडून नुकतीच जेरबंद करण्यात आले. आरोपी विरोधातहिंजवडी ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर आहे. फिर्यादी योगेश गणेश शिंदे वय 34 राहणार कोंढवा खुर्द पुणे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास टीसीएस कंपनीच्या गेट नंबर 2 भोइरवाडी कडे जाणाऱ्या रोडवर आपल्या पत्नीची वाट पाहत हुंडाई कार गाडी क्रमांक (एम एच 12 पी क्यू81 60 )थांबले असताना क्लीन अनोळखी तोंडावर रुमाल बांधलेल्या 20 ते 22 वयोगटातील अनोळखी इसमाने फिर्यादी यांच्या डोक्याला लावून गाडीची ‘चावी दे पैसे दे’ असे म्हणून फिर्यादी यांच्या मालकीची पांढऱ्या रंगाचीहोंडाई एक्सेंट हत्यारांचा धाक दाखवून व मारण्याची भीती दाखवून जबरदस्तीने चोरून नेण्याचा प्रयत्न केला हिंजवडी पोलीस स्टेशनला वरीलप्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून तपास पथकाचे अधिकारी व कर्मचारी हे गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत होते.
या गुन्ह्यातील वरील वर्णनाचे आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना खबरी मार्फत माहिती मिळाली की वर नमूद वर्णनाचे आरोपी हे वराळे तळेगाव दाभाडे या परिसरातील आहेत. मिळालेल्या माहितीनुसार खबरे मार्फत व तांत्रिक बाबींचा आधारे शोध घेतला असता वरील संशय युवकांत पैकी एक युवक अनिकेत मुरुड मधुकर बोराडे 19 राहणार शिव कॉलनी तळेगाव दाभाडे याला प्रथम ताब्यात घेण्यात आले. सखोल तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार रॉकी उर्फ अनिल जयंत जाधव (वय 20 वर्ष, धंदा काही नाही ,राहणार समता कॉलनी ,गोराई रोड, तळेगाव दाभाडे आणि विशाल मंजी नाथ वर्मा( व 19 राहणार काळोखे यांची बिल्डिंग, तळेगाव नगरपरिषद समोर आणि शरद मोरे पूर्ण नाव माहिती नाही वराळे फाटा तळेगाव दाभाडे यांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले.यातील आरोपी रॉकी उर्फ अनिल जयंत जाधव यांनी फिर्याद त्यांना धाक दाखविण्यासाठी वापरल्याचे तपासावर निष्पन्न झाले असल्याने त्यांना गुन्हा दाखल करून अटक करून तपास करण्यात आला आहे.दुसरा आरोपी ज्ञानेश्वर मोरे राहणार मुळशी यांच्याकडून एक दुचाकी गाडी चाळीस हजार रुपये किमतीची पंचवीस हजार रुपये जप्त करण्यात आला आहे व अनिल जाधवत्याच्याकडून गुन्हे करण्यासाठी वापरलेल्या सारखे दिसणारे लाईटर किंमत रुपये ३२५व दुचाकी हिरो होंडा किंमत रुपये ५०हजार असा १ लाख १५ हजार ५२५रुपयाच्या दोन दुचाकी गाड्या असा मला हस्तगत करण्यात आलेला आहे.सदरची कामगिरी आणि कृष्णप्रकाश पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड शहर माननीय सुधीर हिरेमठ पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा माननीय श्रीधर जाधव सहायक पोलिस आयुक्त वाकड विभाग यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे तपास पथकाचे सहायक पोलिस निरीक्षक सागर काटे सहाय्यक पोलीस फौजदार वायसे पोलीस हवालदार बाळकृष्ण शिंदे किरण पवार खातिक शेख हनुमंत कुंभार गुरव अमर राणे पालवे चंद्रकांत गडदे श्रीकांत चव्हाण जनक लाडू विवेक गायकवाड यांनी केली.





















































