पिपीसी न्यूज नेटवर्क;
प्रतिनिधी अजय जाधव !
प्रदीप गाजरे यांचा खराडी बायपास नगर रोड येथे ट्रॅव्हल्स बॅटरीच्या व्यवसायाचे दुकान काही दिवसांपूर्वी अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर तोडून लॅपटॉप व दोन मोबाईल टॅब चोरून नेले. याबाबत प्रदीप गाजरे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल१६ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
विमानतळ पोलिस ठाण्याचे तपास पथकाने पुण्यातील अज्ञात आरोपी चा तपास सुरू केला आजूबाजूच्या परिसरातील ७५ सी. सी. टी. व्हीं. कॅमेरा च्या आधारे गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढत आरोपींना अटक करण्यात आली. मंगेश विजय चव्हाण (वय २२, नाना पेठ पुणे), शाहरुख इरशाद शेख (वय २५, रा. नाना पेठ पुणे) अशी आरोपींची नावे असून त्यांनी केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून ४ लॅपटॉप, २ मोबाईल टॅब असा एकूण १,४०,०००/-किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विमानतळ पोलिसांनी ही कामगिरी गुन्हा झाल्यापासून ७२ तासात उघडकीस आणली आहे. यातील आरोपी मंगेश चव्हाण याच्यावर अशा प्रकारचे १८ गुन्हे यापूर्वी दाखल असून तो सराईत गुन्हेगार आहे. आरोपींनी अशा प्रकारचे आणखी गुन्हे केली असण्याची शक्यता असल्याने विमानतळ पोलीस त्यांच्याकडे अधिक तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, शहर, पंकज देशमुख, पोलीस उपायुक्त, परी-०४ पुणे शहर, किशोर जाधव सहा. पोलीस आयुक्त, येरवडा विभाग पुणे शहर, यांचे आदेशानुसार गुन्ह्याचा तपास गजानन पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, विमानतळ पोलिस स्टेशन पुणे शहर, मंगेश जगताप पोलीस निरीक्षक (गुन्हे) विमानतळ पोलिस स्टेशन पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक हनुमंत गिरी, सचिन जाधव पोलीस अमलदार अविनाश शेवाळे, अशोक आटोळे, उमेश धेंडे, रमेश लो हकरे, विशाल गाढे, संजय काढावी, विनोद महाजन, सचिन भिंगारदिवे, नाना कर्चे, अरुण पाठक, राहुल मोरे, किरण अब्दागिरे ,वैभव खैरे, प्रशांत कापुरे, गिरिष नानेकर, यांच्या पथकाने केली





















































