पुणे : पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. परंतु, हे प्रकरण केवळ राजीनाम्यावर न थांबता मृत्यू प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षाने केली असताना आता जनमानसातूनही अशीच मागणी होत आहे.
बीड जिल्ह्यातील छोट्याश्या गावात राहणाऱ्या पूजा चव्हाण या तरुणीचा पुण्यात झालेला अपघाती मृत्यू आणि त्यानंतर समाज माध्यमांवर कधीच मंत्री राठोड पूजाचे प्रसारित झालेले कॉल रेकॉर्ड यामुळे पूजाचा नक्की इमारतीवरून पडून मृत्यू झाला की तिला प्रवृत्त करण्यात आले, यावरून गेल्या आठ दिवसांपासून वातावरण ढवळून निघाले आहे. महा विकास आघाडीच्या माध्यमातून सत्तेत बसलेल्या शिवसेनेचाच मंत्री अशा प्रकरणात सापडल्याने विरोधी पक्षाला आयती संधी मिळाली आहे. दरम्यान शिवसेना पक्षप्रमुखानकडून कुठलीच ठोस कारवाई होत नसल्याने दोन्हीकडून पक्षाची होणारी कोंडी पाहता राठोड यांनी राजीनामा दिला असल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे.
मात्र, हा राजीनामा राज्यपालांकडे देणे अपेक्षित असताना तो पक्षप्रमुख तथा उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आला आहे. त्यामुळे हा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला असेल; तर तो राज्यपालांकडे देणे अपेक्षित आहे. आणि केवळ राजीनामा देऊन वातावरण शांत न करता पूजाच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी विरोधी पक्षाबरोबरच जनमानसातूनही होत आहे.





















































