पुणे- गुरुवार दिनांक २५/०२/२०२१ रोजी वडगाव जलकेंद्र येथील विद्युत पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीचे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तीचे काम असल्या कारणामुळे अत्यावश्यक देखभाल दुरूस्तींच्या कामांमुळे वडगाव जलकेंद्र परिसरात गुरुवारी पाणीपुरवठा पूर्ण दिवस बंद राहणार आहे.
तसेच शुक्रवार दिनांक २६/०२/२०२१ रोजी सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी सर्व नागरिकांनी याबाबत नोंद घेऊन सहकार्य करावे. पाणी पुरवठा बंद असणारा भाग पुढिलप्रमाणे वडगाव जलकेंद्र परीसर :- हिंगणे, आनंदनगर, बडगाव, धायरी, आबेगावपठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परीसर, कोंढवा बुद्रुक इत्यादी.




















































