पिंपरी-चिंचवड : पिंपळे गुरव:
प्रतिनिधी, ppcnews.in
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २९ मधील भारतीय जनता पार्टी व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) आघाडीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार शुभारंभ उद्या शुक्रवार दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे.
हा प्रचार शुभारंभ कार्यक्रम भैरवनाथ मंदिर, पिंपळे गुरव (गावठाण) येथे होणार असून कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित राहणार आहेत.
प्रभाग क्रमांक २९ मधून भाजप-आरपीआय (आ.) आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून
अ) आंगोळकर रवीना सागर,
ब) धारडे शकुंतला भाऊसाहेब,
क) कदम शशिकांत गणपत,
ड) जगताप श्याम शांताराम
हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमास आमदार श्री. शंकरभाऊ जगताप (आमदार चिंचवड विधानसभा, निवडणूक प्रमुख भाजपा, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका) यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. तसेच भाजपचे वरिष्ठ नेते, माजी नगरसेवक, विविध आघाड्यांचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.





















































