मुंबईः- भांडूप परिसरातील सनराईझ हॉस्पिटलमध्ये आग लागल्याची घटना घडली आहे. ड्रीम्स मॉलमध्ये हे हॉस्पिटल आहे. मॉलच्या पहिल्या मजल्याला आग लागली आणि त्याचा धूर सर्वात वरच्या मजल्यावर असलेल्या सनराईज हॉस्पिटलपर्यंत पोहोचला. सदर घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मुंबई अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आगीचे कारण अद्याप कळू शकले नाही. मी पहिल्यांदाच एखाद्या मॉलमध्ये हॉस्पिटल असल्याचं पाहत आहे, या प्रकरणी नक्कीच कडक कारवाई करण्यात येईल. या रुग्णालयातील कोरोनाग्रस्त रुग्णांना अन्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहितीही महापौर यांनी दिली आहे.
Mumbai: Death toll rises to six in fire at Sunrise Hospital in Dreams Mall at Bhandup West, says BMC
— ANI (@ANI) March 26, 2021
पोलीस उपायुक्त प्रशांत कदम म्हणाले की, रात्री १२.३० च्या सुमारात ड्रीम्स मॉलमधील पहिल्या मजल्यावर आग लागली, लेव्हल ३-४ ची ही आग असल्यानं २३ अग्निशमन दलाचे बंब आग विझवण्यासाठी घटनास्थळी पोहचले. तसेच आतापर्यंत ७६ रुग्णांना कोविड सेंटरला हलवण्याल आलं आहे.
मृतांच्या संख्येबाबत अस्पष्टता-
सदर घटनेत मृतांच्या संख्येबाबत अस्पष्टता दिसून येत आहे. महापालिकेने या घटनेत ६ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. तर मुंबई अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या घटनेत एकूण ९ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.