पीपीसी न्यूज नेटवर्क :-
पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ई.डी.) कारवाई केली आहे.
परकीय चलन गैरव्यवहार प्रकरणात ई.डी.ने अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांची ४० कोटी ३४ लाख रुपयांची मालमत्ता सक्तवसुली जप्त केली आहे.
दरम्यान हा फक्त अजित पवारांवर दाबाव आणण्याचा प्रयत्नं आहे का ?
अशी शंका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी व्यक्त केली आहे.
“अविनाश भोसले अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत हे सर्वांनाच माहिती आहे.
अविनाश भोसले यांची संपत्ती जप्त करत केलेल्या कारवाईवरुन भा.ज.पा. किंवा केंद्राकडून आदेश मिळाल्यानंतर ई.डी. कारवाई करतं हे स्पष्ट दिसत आहे.
सी.बी.आय. आणि ई.डी. या दोन्ही यंत्रणांचा वापर सतत होताना दिसत आहे,”
अशी टीका अंजली दमानिया यांनी व्हि.डी.ओ.च्या माध्यमातून केली आहे.
अविनाश भोसले यांची ४० कोटींची मालमत्ता जप्त “सध्याच्या घडीला शिवसेनेसोबत ‘प्लॅन ए’ प्रमाणे बोलणी करत असतील तर ‘प्लॅन बी’ तयार असावा यासाठी ते अजित पवारांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.
यामध्ये किळसवाणं राजकारण आहे.
कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळाली पाहिजे हे त्यांचं ध्येय आहे,”
अशी टीकाही अंजली दमानिया यांनी भा.ज.पा.वर केली आहे.
अंजली दमानिया यांनी ट्वीटदेखील केलं असून म्हटलं आहे की,
“अविनाश भोसले यांची मालमत्ता ई.डी.कडून सील?
हा फक्त अजित पवारांवर दाबाव आणण्याचा प्रयत्नं आहे का?
खरंतर हे व्हायलाच हव,
पण ई.डी. हे भा.ज.पा.ला सत्ता मिळवून देण्यासाठी करत आहे.
अजित पवारांवर व अविनाश भोसले यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई केली असती तर खरंच आनंद झाला असता”.
अविनाश भोसले यांची मालमत्ता ई.डी. कडून सील?
हा फक्त अजित पवारांवर दाबाव आणण्याचा प्रयत्नं आहे का?




















































