चिंचवड :- पोलिस फ्रेन्डस वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने रविवार दि.१३ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह चिंचवड येथे “शूरा आम्ही वंदिले” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमामध्ये १९६५ आणि १९७१ भारत- पाक युद्ध, कारगिल युद्धात प्रत्यक्ष सहभागी समर सेनानी तसेच पोलिस दलात उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तीमत्वांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे.
या कार्यक्रमासाठी केंद्रीय राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मावळ लोकसभेचे खासदार श्रीरंग बारणे, चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे, माजी महापौर माई ढोरे, माजी उपमहापौर सचिन चिंचवडे, डीवाय, आयजीपी, सीआरपीएफ, पुणे राजेशकुमार सिंह, एसबी पाटील शैक्षणिक संस्था उपाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे, पद्मश्री अर्जुन पुरस्कार (जीवनगौरव) मुरलीकांत पेटकर, किर्ती चक्र विजेते संतोष राळे, Rtd. कॅप्टन ए. के. मिश्रा आदि मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती पोलिस फ्रेन्डस वेलफेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे यांनी दिली.





















































