*पुणे : दिनांक १२ एप्रिल २०२५ :* तरुणी आणि महिलावर्गात विशेष चर्चेचा विषय असलेल्या ग्लॅम मेकअप लूकची एकदिवसीय कार्यशाळा यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या फेमिना फ्लॉन्ट अकॅडमीच्यावतीने आयोजित करण्यात आली होती.
या मोफत कार्यशाळेत प्रात्यक्षिकासह ग्लॅम मेकअप लूक प्रकारामधील नवनवीन ट्रेंड व तंत्र तसेच हा मेकअप करताना नेमकी कोणत्या प्रकारची साधनसामुग्री वापरायची, मेकअप साठीच्या साहित्याची गुणवत्ता तपासून त्यानंतर प्रत्यक्ष मेक अप करतानाचा प्रक्रिया क्रम,मेक अप करण्यापूर्वी चेहऱ्याची स्वच्छता,मेकअपचे साहित्य हाताळताना घ्यावयाची काळजी,आय शॅडोचे प्रकार,आयलायनर,फाउंडेशन बेस आदी महत्वपूर्ण बाबींवर यावेळी प्रशिक्षिका निदा इनामदार यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले.
याप्रसंगी आदिती कांबळे यांनी यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सच्या फेमिना फ्लॉन्ट अकॅडमीच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांबाबत सविस्तर माहिती सांगितली.या कार्यशाळेत सहभागी झालेल्या सर्वांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आली. या कार्यशाळेसाठी रिषिता सरकार, ज्ञानेश्वर गोफण यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यशाळेत मेकअप आर्टिस्ट,ब्युटी पार्लर व्यावसायिक व ब्युटी अँड वेलनेस क्षेत्राविषयी रुची असणाऱ्या युवती व महिलांनी मोठी गर्दी केली होती.





















































