निगडी :प्रतिनिधी,
(ppcnews.in)
दि.२० जून:
निगडी येथे पिंपरी मेट्रो रेल्वेचे काम चालू असलेल्या ठिकाणी मधुकर पवळे उड्डाणपुलाखाली लोखंडी पत्रा अंगावर पडून एक विद्यार्थिनी जबर जखमी झाली आहे. विद्यार्थिनी ही जवळच्याच कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून तिचं नाव नंदिता तरळ आहे.

विशाल ज्वेलर्स समोर आकुर्डी दत्तवाडी येथे मेट्रो नी रेल्वे कंपाऊंड केलेले आहे. सदर कंपाऊंड ची गरज नव्हती. नागरिकांकरता हे कंपाउंड धोकादायक ठरत होतं. याकरिता वेळोवेळी स्थानिक लोकप्रतिनिधींनी मेट्रो अधिकाऱ्यांशी संपर्क केला होता. परंतु मेट्रो प्रशासनाने त्याला दाद दिली नव्हती. आणि आज येथे अपघाताची घटना घडली. विद्यार्थिनीला जखमी अवस्थेत जवळच्या लोकमान्य हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त याआधी स्थानिक नागरिक तसेच लोकप्रतिनिधी मेट्रोच्या रेल्वे प्रकल्पाच्या कामाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी केली होती. याकरता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन देखील निवेदन देण्यात आले होते. परंतु याची दखल वेळेत न घेतल्यामुळे आजचा हा प्रसंग घडला. तरी या प्रकाराची पुनरावृत्ती टाळायची असेल तर त्वरित मेट्रो कामाला स्थगिती देण्यात यावी आणि मेट्रो रेल्वे ठेकेदार ह्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा म्हणून पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह ह्यांना ही मागणी भारतीय जनता पार्टी चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे.





















































