पुणे : प्रतिनिधी,
(ppcnews.in)
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या न्यू लॉ कॉलेजला ‘इंडिया टुडे’,’द वीक’,आणि’जीएचएआरडीसी लॉ सर्व्हे ‘मध्ये राष्ट्रीय स्तरावरील उत्कृष्ट विधी महाविद्यालयाच्या रँकिंग यादीत मानांकन मिळाले आहे. ‘इंडिया टुडे’ च्या सर्वेक्षणात न्यू लॉ कॉलेजला राष्ट्ट्रीय स्तरावरील १३ व्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे.’द वीक’ च्या सर्वेक्षणात न्यू लॉ कॉलेजला राष्ट्रीय स्तरावरील पाचव्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे.

‘जीएचएमआरडी’च्या सर्वेक्षणात न्यू लॉ कॉलेजला राष्ट्ट्रीय स्तरावरील सहाव्या क्रमांकाचे,राज्यात दुसऱ्या क्रमांकाचे मानांकन मिळाले आहे.न्यू लॉ कॉलेजच्या प्रभारी प्राचार्या डॉ.उज्वला बेंडाळे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.’गुणवत्तापूर्ण शिक्षण,सातत्यपूर्ण उपक्रम,सांघिक प्रयत्न आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन यामुळे राष्ट्रीय स्तरावरील मानांकन मिळाले’,असे त्यांनी म्हटले आहे.





















































