पिपीसी न्यूज; प्रतिनिधी अजय जाधव!
पिंपरी-चिंचवड आयुक्तालयातील जबरी चोरी, रोड रॉबरि, वाहन चोरी या गुन्ह्यात प्रतिबंध व्हावा या अनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक साहेब खंडणी/दरोडा विरोधी पथक, गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड यांनी पिंपरी-चिंचवड शहरात गस्त काढण्याचे आदेश दिले होते. पोलीस हवालदार हजारे, रोंगे, बनकर व कोकणे हे खाजगी वाहनाने गहुंजे रोड तळेगाव दाभाडे येथे पेट्रोलिंग करत असताना पोलीस हवालदार बनकर कोकणे यांना खबर॑यामार्फत माहिती मिळाली एक इसम विनीयाड ग्राउंड जवळील शिवप्रसाद गॅरेजसमोर संशयितरित्या थांबलेला असून त्याच्याजवळ चोरीचा मोबाईल आहे. पोलिसांनी बरोबर एक पंच घेऊन वरील स्टाफ सोबत सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता मिळालेल्या बातमीच्या वर्णनाप्रमाणे एक संशयित थांबलेला असल्याची खात्री केली. तो पळून जाणार नाही याची खबरदारी घेऊन त्या आरोपीस ताब्यात घेतले. आरोपी जवळ आधीक चौकशी केली असता आरोपीने त्याचे नाव आनंद सन मोगम एनडी ( वय १९रा. साईनगर गजानन सोसायटी गहुंजे ता. मावळ, जिल्हा पुणे) असे असल्याचे सांगितले. सदर आरोपी ची झाड झडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशामध्ये एक काळ निळ्या रंगाचा ओप्पो कंपनीचा मोबाईल सापडला. सदर मोबाईलच्या पावती बाबत चौकशी केली असता त्याने साथीदार जोयेल भास्कर पलानी (रा. साईनगर, तळेगाव पुणे) व कादिर कलीम खान (रा. देहूरोड पुणे)यांच्याबरोबर सात महिन्यापूर्वी गहुंजे गाव, तालुका मावळ ,जिल्हा पुणे येथून १ लॅपटॉप,२ मोबाईल फोन चोरी केले होते. एचपी लॅपटॉप कादर खान याने स्वतःजवळ ठेवून, जोयल पिलानी यांनी २मोबाईल फोन स्वतःजवळ ठेवले होते. नंतर काही दिवसांनी एक मोबाईल फोन आरोपीने स्वतः वापराकरता ठेवून घेतला होता. सदर बाबतचा गुन्हा तळेगाव पोलीस ठाणे यापूर्वी दाखल करण्यात आला होता. आरोपीकडून मोबाईल फोन कि.रू.२०,०००/- ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याच्या पुरावे काम पोलिसांनी जप्त केला.





















































