पुणे, दि. 16 : पुणे विभागातील 12 लाख 32 हजार 984 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 14 लाख 14 हजार 194 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 1 लाख 54 हजार 155 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 27 हजार 55 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 1.91 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 87.19 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.
पुणे जिल्हा
पुणे जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 9 लाख 64 हजार 119 रुग्णांपैकी 8 लाख 66 हजार 389 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 82 हजार 621 आहे. कोरोनाबाधित एकूण 15 हजार 109 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 1.57 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 89.86 टक्के आहे.
सातारा जिल्हा
सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 34 हजार 957 रुग्णांपैकी 1 लाख 8 हजार 669 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 23 हजार 699 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 589 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 1 लाख 28 हजार 925 रुग्णांपैकी 1 लाख 8 हजार 72 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 17 हजार 377 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 476 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्हा
सांगली जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 99 हजार 306 रुग्णांपैकी 79 हजार 442 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 985 आहेत. कोरोनाबाधित एकूण 2 हजार 879 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्हा
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना बाधीत एकूण 86 हजार 887 रुग्णांपैकी 70 हजार 412 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 13 हजार 473 आहेत. कोरोनाबाधित एकूण 3 हजार 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 12 हजार 891 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 5 हजार 469, सातारा जिल्ह्यात 1 हजार 686, सोलापूर जिल्ह्यात 2 हजार 374, सांगली जिल्ह्यात 1 हजार 601 तर कोल्हापूर जिल्ह्यात 1 हजार 761 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण
पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 18 हजार 354 आहे. पुणे जिल्हयामध्ये 9 हजार 214, सातारा जिल्हयामध्ये 3 हजार 836, सोलापूर जिल्हयामध्ये 2 हजार 240, सांगली जिल्हयामध्ये 1 हजार 573 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 1 हजार 491 रुग्णांचा समावेश आहे.
विभागातील लसीकरण प्रमाण
पुणे विभागात आजपर्यंत लसीकरण झालेल्या नागरिकांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 25 लाख 11 हजार 560, सातारा जिल्ह्यामध्ये 6 लाख 81 हजार 422, सोलापूर जिल्हयामध्ये 4 लाख 76 हजार 378, सांगली जिल्हयामध्ये 6 लाख 46 हजार 947 तर कोल्हापूर जिल्हयामध्ये 11 लाख 17 हजार 78 नागरिकांचा समावेश आहे.
पुणे विभागातील सर्व्हेक्षण
आजपर्यत विभागामध्ये एकुण 78 लाख 2 हजार 902 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 14 लाख 14 हजार 194 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.
![*पुणे विभागातील 12 लाख 32 हजार 984 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी* *विभागात कोरोना बाधित 14 लाख 14 हजार 194 रुग्ण* *-विभागीय आयुक्त सौरभ राव](https://ppcnews.in/wp-content/uploads/2021/05/images-24.jpeg)
*पुणे विभागातील 12 लाख 32 हजार 984 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी* *विभागात कोरोना बाधित 14 लाख 14 हजार 194 रुग्ण* *-विभागीय आयुक्त सौरभ राव
Share this: