पुणे जिल्हयातील खेडशिवापूर टोल प्लाझा, पाटस टोल प्लाझा, सरडेवाडी टोल प्लाझा व चालकवाडी टोल प्लाझा वर अव्यवसायिक (कार/जीप/व्हॅन) वाहनांसाठी, प्रवाशांसाठी वार्षिक टोल (फास्टॅग) पास सुरू होत असल्याचे प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांनी कळविले आहे.
ही योजना फक्त अव्यवसायिक (कार/जीप/व्हॅन) वाहनांसाठी व प्रवाशांसाठी असणार आहे. वार्षिक टोल (फास्टॅग) पासची वैधता १ वर्ष किंवा २०० एकेरी वाहनांच्या फेऱ्यांसाठी यापैकी जे आधी होईल ते लागू राहील. फक्त राष्ट्रीय महामार्ग व राष्ट्रीय दुतगती महामार्गावरील टोल प्लाझांसाठी वैध असून, वार्षिक टोल (फास्टॅग) पासची किंमत फक्त तीन हजार रुपये इतकी राहील.

वार्षिक टोल पास (फास्टॅग) मिळविण्यासाठी तसेच सक्रियता आणि नूतनीकरणासाठी राजमार्ग यात्रा मोबाईल अॅपवर तसेच भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी १०३३ या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असेही प्रकल्प संचालक, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांना प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.




















































