पि.पी.सी.न्यूज प्रतिनिधी; अजय जाधव!
लोणावळा: शिवसेना माजी शहरप्रमुख व शिवसेना संस्थापक कै. उमेश भाई शेट्टी यांचे आज सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरासमोर निर्घुण हत्या करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार शेट्टी यांच्या डोक्यावर व मानेवर धारदार शस्त्रांनी वार करत जवळून तीन गोळ्या गोळ्या मारण्यात आले आहेत त्यांना तातडीने लोणावळ्यातील परमार रुग्णालयात हलविण्यात आले त्याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.
दसऱ्याच्या रात्री हनुमान टेकडी येथील गणेश नायडू या युवकाचा देखील धारदार शस्त्राने वार करून खून झाल्याची घटना घडली होती या दोन्ही घटनांनी लोणावळा शहर हादरून गेले आहे. मागील चार-पाच दिवसांपूर्वी लोणावळ्यात सुरज अग्रवाल नामक युवकाला दोन गावठी पिस्तल, कोयता व चाकू या हत्यारांचा पकडला होता. एकामागोमाग एक घडलेल्या घटनांनी लोणावळा शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
दरम्यान शेट्टी यांच्या हत्याप्रकरणी एक प्रत्यक्षदर्शी असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. परमार रुग्णालयाच्या बाहेर शेट्टी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती.
याविषयी बोलताना लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलिस अधीक्षक नवनित का़ॅवत म्हणाले आरोपींचा तातडीने छडा लावत यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली जाईल.
नागरिकांनी संयम पाळावा कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन कॉवत यांनी केले आहे.





















































