पीपीसी. न्यूज; प्रतिनिधी अजय जाधव!
मुळशीतील पूर्व भागातील गुन्हेगारी सह अवैध धंद्यांवरती बुधवारी रात्री माण मधील दारू भट्टी उध्वस्त करीत हिंजवडी पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी सत्र सुरू ठेवले आहे. नंतर गुरुवारी दुपारी बावधन मध्ये२ लाख ७३६८५ रुपये किमतीचा गुटखा जप्त करून एकाला अटक करण्यात आली आहे.
बावधन मधे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी गुटका जप्तीची धडक कारवाई केली. या कारवाईत २ लाख ७३,६८५ गुटका व १ लाख ७५ हजाराची ओमनी व्हॅन पोलिसांनी जप्त केली व एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले. आणि विशेष म्हणजे दोन दिवसापूर्वी हिंजेवडी हद्दीत ३१ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला होता.
पिंपरी-चिंचवड शहराचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी वेळोवेळी अवैध धंदे चा शोध घेऊन तो मुळासहीत नष्ट करण्याचे आदेशदिल्याप्रमाणे हिंजवडी पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने हिंजवडी हद्दीतील गावठी हातभट्टीची दारू तयार करणाऱ्या भट्टी पोलिसांतर्फे उद्ध्वस्त करण्यात आल्या तो लाखो रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले. सदर ठिकाणी पोलिस पथकाने १७,५०० रुपयाचे एकूण पाच हत्ती कॅन, गावठी दारूने भरलेले १,५०,००० रुपयाचे दारू करण्यासाठी लागणारे अंदाज ३००० लिटर रसायन ५०० रुपयांची लोखंडी चाटू व इतर साहित्य असा एकूण १,६७,०००रुपयाची गावठी दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन तसेच इतर साहित्य जप्त केले आहे.
गुन्ह्यातील आरोपी राठोड यांचा शोध घेऊन त्यास हद्दपार करण्याची कारवाई पोलीस स्टेशन मार्फत करण्यात येणार आहे.हिंजवडी पोलिस स्टेशनचे तपास पथकाचे पोलीस अमलदार शोध घेत असून बाबू राठोड हिंजवडी परिसरात राहत नसून तो कोथरूड येथील राहणारा असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झालेली आहे.कोथरूड येथून गावठी दारू तयार करून ती वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचवले असल्याची माहिती मिळाली आहे.





















































