
पिंपरी :- शिवसेना नेते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून पिंपरी चिंचवड महापालिकेस ४२० लिटर सोडीअम हाइड्रोक्लोराइड आणि २०० सॅनिटयझर देण्यात आले. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांच्याकडे हे साहित्य सुपूर्द करण्यात आले. यावेळी शिवसेना गटनेते राहुल कलाटे, जेष्ठ नेत्या सुलभा उबाळे, नगरसेवक अमित गावडे उपस्थित होते



















































